Sufi

जुने फर्निचर !

/ मे ०१, २०२४

चित्रपट इमोशनल वाटेल आणि तसाच आहे ते नावावरुन कळतं. पण म्हणून त्याच त्या जुन्या धाटणीतला नाही. वेगळा प्लॉट आहे, ट्विस्ट आहे. हो मागण्या आणि म्हणणं आपल्या घरातल्या ज्येष्ठ सिनियर सिटिझन झालेल्या आई वडिलांचं आहे. महेश मांजरेकरने ज्या निगुतीने चित्रपट केला तो त्यांच्या वयाशी जेवढा संलग्न तेवढाच त्यांच्या फ्रेंड सर्कल मुळे जास्त मनापासून बनवला असे वाटते.  

आणि माझ्या वयातल्या मुला मुलींच्या वागणुकीचे आहे. पण त्यातला एकही शब्द खोटा नाही. शरीर थकल्यावर वृद्धांकडे कितीही पैसे असले तरी विचारपूस करणारी त्यांची अशी माणसं लागतात आणि दुर्दैवाने त्यांची अपत्य असलेल्या आपल्याला ही गोष्ट कळत नाही.


आई वडील आपल्याला मोठं करता. पैसे हातात आले की आपण म्हणू लागतो उपकार थोडी केले. सगळेच करतात. पण जर तुम्ही सामंजस्याचा त्या टप्प्यावर आले असाल तर तुम्हाला हे कळेल की आपल्या हातून कोणासाठी लवकर काही केलं जात नाही. त्यामुळे सगळेच नाही करत. 


हो हे चक्र आहे. आज आपण कोणाचे तरी मुल आहोत. उद्या आपली मुलं होऊन आपण आई वडील होणार आहोत. त्यामुळेच कदाचित म्हणत असावे की, इथे केलेलं इथेच फेडावे लागेल. 

वृद्ध होणाऱ्या आई वडिलांसाठी मूल-सून, मुलगी- जावई ही नाती खूप महत्त्वाची असतात. कारण वृद्ध होतानाचा प्रवास खूप धीमा असतो. 


लग्न झाल्यावर दोघांचे आई वडील तेवढेच महत्त्वाचे ही जाणीव पैसा कमावताना जोडप्याच्या मनात असायला हवी. आपण कमवायला लागतो म्हणजे काही नवीन करत नसतो. कारण त्यांनी आपलं वय आधीच जगून घेतलंय त्यामुळे त्यांना सांगून पाहिले तर ते समजून घेतात. 

पैसे हातात येऊ लागले की माणूस आपल्या माणसांशी कसा वागतो यावर तो माणूस सेल्फिश आहे की नाही ठरत असं मला वाटतं. 


धावपळीचा जगात हो थोडं वेळ मिळणं कठीण होतं पण इतकं कोरडं जगून काय करायचं? जेवढा वेळ मोबाईलवर रिल बघण्यात जातो तेवढ्यात एक कॉल करुन होतो. हो मान्य आहे बऱ्याचदा घरचे त्या एका कॉल मध्ये काही टेन्शन देणारं सांगू शकता पण म्हणून तुम्ही टाळण्यामुळे काय होऊ शकतं याचा रियालिटी चेक देणारा “जूना फर्निचर” चित्रपट आहे. मला तर आनंद आहे असे चित्रपट बघायला आजही थिएटर फुल होतं आणि काहीजण फॅमिलीसह, काही तरुण तरुणाई, काही सिनियर सिटिझन कपल्स आलेले. 


सगळे म्हणता मुलाच्या आई वडिलांशी सून नीट वागत नाही. त्यामुळे सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात जावे लागते. अशा अनेक सूना आहे ज्यांच्यामुळे सासू सासऱ्यांना त्यांचच घर खायला उठले. का मुलीसुद्धा स्वतःहून सासरचे घर आपलेस करुन घेत नाही. मात्र मैत्रिणींशी बोलल्यावर त्यांचं म्हणणं असतं, सासू केवळ सुनेसारखं कामापुरते वागते. सासूनेही मायेने जवळ घेतल तर सुनेला घर आपलेसे वाटेल. 

आणि जसं काही सूनांमुळे मुलाच्या आई वडिलांना त्रास सहन करायला लागतो. मुलाचे आई वडील त्याच्या दूर होता, तसेच जावयामुळे सुद्धा अनेक मुली त्यांच्या आई पासून दूर होतात. मुलगी सासरी जाते त्यामुळे आई मुलीची ताटातूट होते. मात्र तरीही मुलीने आईला फोन केला तरी काही नवऱ्यांना आणि सासरच्यांना मान्य नसतं. 


बऱ्याचदा मुलाच्या किंवा मुलीच्या घरी भांडणं झाली आणि अशावेळी ती मुलगा किंवा मुलगी इमोशनल असून दुःखी होते. मात्र नेमकं अशावेळी आपण संवेदनशील होताना चुकीचा खांदा मिळाला की अनेक चांगली नाती सहज सांधता येणारी तुटतात. काही नवरा बायकोंचे नाते तसे असते. सासरी भांडण सुरू म्हणून बायको नवऱ्याला अजून पेटवून देते किंवा माहेरी भांडणं सुरु तर नवरा हा बायकोला विरोधात पेटवून देणार. त्यामुळे जर आपल्याला नाती जोडता येत नसतील तर किमान तोडू तरी नाही. आपल्याला वाईट वाटत असताना चुकीचे सल्ले मिळाले की माणसाला वाईट वागण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो त्या नात्यात झालेल्या गोष्टी नीट करण्यास पुढाकारही नाही घेत. नवरा बायको म्हणून आपण दोन्ही घरं जपण्याचा प्रयत्न ठेवायला हवा. 


दूर राहत असल्यावर तर नक्कीच आपल्या मनात बऱ्याचदा आई वडिलांची आठवण येते. सुरुवातीला आपण फोन करतो, भेटायला जातो. पण एका काळानंतर आपण आपल्याला खोटा दिलासा देऊ लागतो. कारण या वयात आपल्या आई वडिलांचे डायलॉग इमोशनल अत्याचार आणि गिल्ट वाटू लागतो. पण आपण तिथेही स्वतःला दिलासा देतो. आई वडीलच आहे घेतील समजून म्हणू लागतो. पण तसं नसतं. याचंही प्रैक्टिकल जुने फर्निचरमध्ये दाखवले आहे. 


हा सिनेमा तसा जास्त चालणार नाही. कारण आपल्याकडे अशा सिनेमांना लिमिटेडच प्रेक्षक येतो. पण सीनियर सिटिजनच्या आणि आई वडिलांच्या वेदना पोहोचवण्याचा आणि तुम्ही मोठव

झाले तरी आई वडिलांकडे दुर्लक्ष करू नका हे रिमाइंडर देण्याचा प्रयत्न खरच खूप उत्तम केला. 


: पूजा ढेरिंगे

#जुनेफर्निचर 

चित्रपट इमोशनल वाटेल आणि तसाच आहे ते नावावरुन कळतं. पण म्हणून त्याच त्या जुन्या धाटणीतला नाही. वेगळा प्लॉट आहे, ट्विस्ट आहे. हो मागण्या आणि म्हणणं आपल्या घरातल्या ज्येष्ठ सिनियर सिटिझन झालेल्या आई वडिलांचं आहे. महेश मांजरेकरने ज्या निगुतीने चित्रपट केला तो त्यांच्या वयाशी जेवढा संलग्न तेवढाच त्यांच्या फ्रेंड सर्कल मुळे जास्त मनापासून बनवला असे वाटते.  

आणि माझ्या वयातल्या मुला मुलींच्या वागणुकीचे आहे. पण त्यातला एकही शब्द खोटा नाही. शरीर थकल्यावर वृद्धांकडे कितीही पैसे असले तरी विचारपूस करणारी त्यांची अशी माणसं लागतात आणि दुर्दैवाने त्यांची अपत्य असलेल्या आपल्याला ही गोष्ट कळत नाही.


आई वडील आपल्याला मोठं करता. पैसे हातात आले की आपण म्हणू लागतो उपकार थोडी केले. सगळेच करतात. पण जर तुम्ही सामंजस्याचा त्या टप्प्यावर आले असाल तर तुम्हाला हे कळेल की आपल्या हातून कोणासाठी लवकर काही केलं जात नाही. त्यामुळे सगळेच नाही करत. 


हो हे चक्र आहे. आज आपण कोणाचे तरी मुल आहोत. उद्या आपली मुलं होऊन आपण आई वडील होणार आहोत. त्यामुळेच कदाचित म्हणत असावे की, इथे केलेलं इथेच फेडावे लागेल. 

वृद्ध होणाऱ्या आई वडिलांसाठी मूल-सून, मुलगी- जावई ही नाती खूप महत्त्वाची असतात. कारण वृद्ध होतानाचा प्रवास खूप धीमा असतो. 


लग्न झाल्यावर दोघांचे आई वडील तेवढेच महत्त्वाचे ही जाणीव पैसा कमावताना जोडप्याच्या मनात असायला हवी. आपण कमवायला लागतो म्हणजे काही नवीन करत नसतो. कारण त्यांनी आपलं वय आधीच जगून घेतलंय त्यामुळे त्यांना सांगून पाहिले तर ते समजून घेतात. 

पैसे हातात येऊ लागले की माणूस आपल्या माणसांशी कसा वागतो यावर तो माणूस सेल्फिश आहे की नाही ठरत असं मला वाटतं. 


धावपळीचा जगात हो थोडं वेळ मिळणं कठीण होतं पण इतकं कोरडं जगून काय करायचं? जेवढा वेळ मोबाईलवर रिल बघण्यात जातो तेवढ्यात एक कॉल करुन होतो. हो मान्य आहे बऱ्याचदा घरचे त्या एका कॉल मध्ये काही टेन्शन देणारं सांगू शकता पण म्हणून तुम्ही टाळण्यामुळे काय होऊ शकतं याचा रियालिटी चेक देणारा “जूना फर्निचर” चित्रपट आहे. मला तर आनंद आहे असे चित्रपट बघायला आजही थिएटर फुल होतं आणि काहीजण फॅमिलीसह, काही तरुण तरुणाई, काही सिनियर सिटिझन कपल्स आलेले. 


सगळे म्हणता मुलाच्या आई वडिलांशी सून नीट वागत नाही. त्यामुळे सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात जावे लागते. अशा अनेक सूना आहे ज्यांच्यामुळे सासू सासऱ्यांना त्यांचच घर खायला उठले. का मुलीसुद्धा स्वतःहून सासरचे घर आपलेस करुन घेत नाही. मात्र मैत्रिणींशी बोलल्यावर त्यांचं म्हणणं असतं, सासू केवळ सुनेसारखं कामापुरते वागते. सासूनेही मायेने जवळ घेतल तर सुनेला घर आपलेसे वाटेल. 

आणि जसं काही सूनांमुळे मुलाच्या आई वडिलांना त्रास सहन करायला लागतो. मुलाचे आई वडील त्याच्या दूर होता, तसेच जावयामुळे सुद्धा अनेक मुली त्यांच्या आई पासून दूर होतात. मुलगी सासरी जाते त्यामुळे आई मुलीची ताटातूट होते. मात्र तरीही मुलीने आईला फोन केला तरी काही नवऱ्यांना आणि सासरच्यांना मान्य नसतं. 


बऱ्याचदा मुलाच्या किंवा मुलीच्या घरी भांडणं झाली आणि अशावेळी ती मुलगा किंवा मुलगी इमोशनल असून दुःखी होते. मात्र नेमकं अशावेळी आपण संवेदनशील होताना चुकीचा खांदा मिळाला की अनेक चांगली नाती सहज सांधता येणारी तुटतात. काही नवरा बायकोंचे नाते तसे असते. सासरी भांडण सुरू म्हणून बायको नवऱ्याला अजून पेटवून देते किंवा माहेरी भांडणं सुरु तर नवरा हा बायकोला विरोधात पेटवून देणार. त्यामुळे जर आपल्याला नाती जोडता येत नसतील तर किमान तोडू तरी नाही. आपल्याला वाईट वाटत असताना चुकीचे सल्ले मिळाले की माणसाला वाईट वागण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो त्या नात्यात झालेल्या गोष्टी नीट करण्यास पुढाकारही नाही घेत. नवरा बायको म्हणून आपण दोन्ही घरं जपण्याचा प्रयत्न ठेवायला हवा. 


दूर राहत असल्यावर तर नक्कीच आपल्या मनात बऱ्याचदा आई वडिलांची आठवण येते. सुरुवातीला आपण फोन करतो, भेटायला जातो. पण एका काळानंतर आपण आपल्याला खोटा दिलासा देऊ लागतो. कारण या वयात आपल्या आई वडिलांचे डायलॉग इमोशनल अत्याचार आणि गिल्ट वाटू लागतो. पण आपण तिथेही स्वतःला दिलासा देतो. आई वडीलच आहे घेतील समजून म्हणू लागतो. पण तसं नसतं. याचंही प्रैक्टिकल जुने फर्निचरमध्ये दाखवले आहे. 


हा सिनेमा तसा जास्त चालणार नाही. कारण आपल्याकडे अशा सिनेमांना लिमिटेडच प्रेक्षक येतो. पण सीनियर सिटिजनच्या आणि आई वडिलांच्या वेदना पोहोचवण्याचा आणि तुम्ही मोठव

झाले तरी आई वडिलांकडे दुर्लक्ष करू नका हे रिमाइंडर देण्याचा प्रयत्न खरच खूप उत्तम केला. 


: पूजा ढेरिंगे

#जुनेफर्निचर 
Continue Reading


पदराच्या आडून जगणाऱ्या बायांचं आयुष्य कसं दिसतं याचं पडद्यावर केलेलं रेखाटन कमाल ताकदीचं आहे. यासाठी किरण रावला सलाम! रविवारी इतका फ्रेश कंटेंट पाहायला मिळाल्याचे सुख काही और आहे. 

एक असा चित्रपट ज्यात तुम्हाला हजारो वर्षांपासून ते एकविसाव्या शतकापर्यंत समाजाने केलेल्या फ्रॉडचा रोडमॅप दाखवला जातो. तेही अतिशय विनोदी पद्धतीने! पण या विनोदातूनही नेमका काय मेसेज प्रेक्षकांना द्यायचाय याचं सखोल ज्ञान स्क्रिप्ट रायटरला आहे. डायलॉग रायटरसमोर नतमस्तक व्हावं इतकी परिपूर्ण लेखणी हाताळली आहे. शिवाय चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणीही प्रसिद्ध नट नटी नाहीये. तरीही चित्रपट खूप सुखाने प्रेक्षकांना जवळचा वाटतो. ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांना मी पहिल्या वाक्यात कोणत्या फ्रॉडबद्दल बोलतेय हे लक्षात आले असेल. तर सांगते, सैराटमध्ये परश्या अन् आर्चीला साऊथमध्ये भेटलेली गाड्यावरची मावशी आठवा. तीच मावशी या चित्रपटातही समोसा वगैरेचा गाडा लावून स्वतंत्र आयुष्य जगत असते. छाया कदम कमालीचे अभिनयाचे स्किल असलेली मराठी अभिनेत्री! तिने या चित्रपटात जो भाषेचा लहेजा पकडला तो लाजवाब आहे. इथे ती घराचा पत्ता, सासरचा पत्ता माहीत नसलेल्या इन शॉर्ट हरवलेल्या एक नववधूला अर्ध्या चित्रपटात सहारा देते. यावेळी ती म्हणते, 

ई देस के लड़की लोग के साथ हज़ारों सालों से इक फ़्रौड़ चलरा, उ का नाम हैं “भले घर की बहु बेटी“ 

सलमान ख़ान का पता बता छोटू? यावर त्या टपरीवर काम करणारा छोटू सांगतो, गैलेक्सी अपार्टमेंट, बांद्रा, बंबई। 


तेव्हा छाया म्हणते, छोटू जिस घर कभी जानेवाला नहीं उसका पता उसने अपने आप याद कर लिया। और तुमको जिस घर पूरा ज़िंदगी रहना हैं वहाँ का पता तक याद नहीं। तुम्हड़ी अम्माने तुम्हें अच्छा नहीं बनाया हैं, गुड़बग़ (Fool) बनाया हैं। 

गुड़बग़ होना शर्म का बात नहीं हैं, लेकिन गुड़बग़ होने पर गर्व करना ई शर्म का बात हैं। 


इथला पूर्ण संवाद ऑलमोस्ट सगळ्या मुलींच्या बालपणापासून आईकडून होणाऱ्या संगोपनावर बोट ठेवतो आणि तेही खूप तीक्ष्णपणे! आई म्हणून बघताना अनेकींना हा संवाद टोचेल पण जर आपली मुलगी हरवल्यावर तिला तिच्या घरी जाता येईल इतकं सक्षम आपण नाही बनवले तर हा समाज तिचे शोषण करणारच. तिला घरचं सगळं काम येतं पण जर तिला घरीच जाता येत नाही तर तिच्या जिवंत असण्याचा काय फायदा? तिचा जन्म का फक्त याचं त्याचं ऐकून सगळ्यांना खूश ठेवण्यासाठी झालाय? 

त्या मुलीच्या वयापेक्षा लहान मुलगा पैसे कमवून घर चालवतो आणि मुलगी असल्यामुळे लग्न लावून द्यायचं? तिचं आयुष्य फक्त २ घरांपुरतं सीमित? या मुलगा मुलगी भेदाचे चित्रीत वर्णन कमाल सुंदर आहे. 

असंही आपल्या समाजात सोशिक, सहनशील बायकांनाच मान आहे. बंड करणाऱ्या बायकांची भीती वाटते. असंच काहीस मत छाया सुद्धा मांडते. 

चित्रपटात असलेला छोटू नामक पात्र वयाच्या ७ वर्षापासून काम करतो. त्यावर गाड्यावर काम करणारी नववधू छायाला विचारते, हम लड़कियों को काहें मौक़ा नहीं देते दादी? काहें हमको इतना लाचार बना देते हैं? छाया उपहासाने आणि सामंजस्याने हसून उत्तर देते, ती म्हणते, भीतीमुळे कदाचित! बाई धान्य उगवू शकते, बनवूही शकते. मूल जन्माला घालू शकते आणि वाढवूही शकते. 

बघायला गेलं तर बाईला पुरुषाची काही खास गरज नाहीये. पण ही गोष्ट जर बायांच्या लक्षात आली तर पुरुषांची वाट नाही लागणार? आता समजलं काय फ्रॉड सुरू आहे? … 

यावर जी नववधू नवऱ्याचं नाव घ्यायला पण घाबरते/

लाजते ती म्हणते, इथून घरी जाऊन छोटं मोठं का होईना पण काम नक्की करणार.  


चित्रपटाची बेसिक स्टोरिलाईन सांगू तर, नुकतंच लग्न झालेली सेम बॅचच्या टेलर वर्गाकडून सेम रंगाची शिवलेला शेरवानी ड्रेस आणि सेम ब्राऊन शूज घातलेले नवरे आणि सेम लाल रंगाची दुल्हन साडी, त्यावर नाकाच्या खालपर्यंत ओढलेली लाल ओढणी अशा झेरॉक्स कॉपी बनलेल्या या ३ जोडप्यात दोन जोडप्यांच्या बायकांची अदलाबदली होते. ही जोडपी मुलीच्या गावी लग्न करुन मुलीच्या सासरी ट्रेनने परतत असता. जसं काल रविवारी एकाच दिवशी एवढी लग्न होती जर अचानक सगळ्यांना एकत्र केलं असतं तर कोणाची बाई कोण अन् बाप्या कोण हे त्या जोडप्यांना कळलं नसतं. तसंच काहीस लापता लेडीज मध्ये घडतं. या चित्रपटातल्या कोवळ्या मुली तर नुकत्याच अंड्यातून बाहेर पडणार होत्या तेवढ्यात त्यांचं लग्न लावून देण्याचं समाजाचं प्रपोजल त्यांना आखून दिलेल्या बांगडीतच रहायला शिकवतं. अनोळखी माणसांच्या नजरेत पोर पडू नाही म्हणून घरचे हातावरच्या फोडासारख पोरीला जपता आणि एक दिवस अनोळखीच मुलाच्या हातात केवळ एक दिवसाच्या भेटीत तिला सुपूर्द करुन देता. तसंच या लापता लेडीजचं होतं. कधी गावाबाहेर न पडलेल्या या नववधू सासरी जाताना अचानक लापता होता. कारण ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे जेव्हा एका नववर त्याच्या डियर बायकोचा हात धरून गर्दीतून पळून जाऊन डायरेक्ट स्वतःच्या घरी जाऊन घुंघट काढून बघतो तर काय ? नवरीची अदलाबदली झालेली असते आणि इथून परिचय होतो पुष्पा राणी ऊर्फ जयाराणी उर्फ प्रतिभा रांता (खरे नाव), फूल कुमारी

उर्फ नितांशी गोयल आणि नेटफ्लिक्सवर मध्यंतरी आलेल्या जमताराच्या स्कॅमचा भाग असलेला स्पर्श श्रीवास्तवचा….  

पक्षपाती दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर हा चित्रपट महिला वर्गाला अतिशय आवडणारा आहे. लोक याला फेमिनिज्मचा प्रोपगंडा चित्रपट म्हणतील. पण याने साडीच्या पदराआड बाईच्या वाट्याला जे आलं ते झाकलं जाणार नाही. 

तुम्हीही कधी ना कधी अशा बाया पाहिल्याच असतील ज्याच्या डोक्यावरून हनुवटीपर्यंत लांब घुंघट आहे किंवा बुरख्यातील स्त्री पाहिलीच असेल. बुरख्यातील स्त्रीचे किमान डोळे उघडे असता. मात्र लांब घुंघट घेणाऱ्यांना मात्र पदर खाली ढळू देता येत नाही. या चित्रपटाला कदाचित हरयाणा, यूपी, बिहार, राजस्थानसारख्या भागातून विरोध झाला असावा किंवा होईल. कारण तिथल्या लोकांसाठी विषय तसा सेन्सिटिव असणार. चित्रपट कळत नकळत मुलींना न मिळणारे समान हक्क, समान संधी आणि फ्रीडम यावर खूप सामंजस्याने, प्रगल्भतेने भाष्य करते.  

एक बार घूँघट ले लिया तो सामने नहीं नीचे देखकर चलना सीख लेना| या डायलॉगने खरा चित्रपट सुरु होतो. 

आणि जैविक शेतीविषयक शिक्षण घेण्याची आवड असणाऱ्या जया राणीच्या धाडसी कहाणीनंतर चित्रपट संपतो. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ज्योतीने चोरलेली एक बांगडी आणि त्या बांगडीतच मंगळसूत्र ठेवून म्हणते, ये मेरा नहीं हैं| हे चित्रित डिटेलिंग चित्रपटाला खूप सुंदर बनवते. यातून विशेष करून बाईचं आयुष्य बांगडी आणि मंगळसूत्रानंतर कसं वर्तुळात अडकते हे दाखवणारी ही फ्रेम ठरते. ज्योती राणीचं अपराधी असल्यासारखे सुरुवातीचे सिन चित्रपटाला खूप सुंदर वळण देतात. 

स्पर्श श्रीवास्तव मात्र कमालीचे काम करतो. तो फार मोठा आणि आर्टिस्टिक अभिनेता होणार यात शंका नाही. तो त्याच्या हरवलेल्या फूल कुमारीचा आणि त्याचा फोटो घेऊन तिचा खूप निरागसपणे शोध घेतो. पण फूल कुमारी सापडणार कशी? कारण त्या फोटोतसुद्धा तिने मानेपर्यंत घुंघट घेतलेला असतो. यावर तर एवढं हसू येतं 😂😂


पण घुंघट घालून राहणाऱ्या बाईचं आयुष्य कसं असेल हा साधा विचारही जास्त लोकांच्या डोक्यात आला नसेल. म्हणजे आपल्याकडे दिसणाऱ्या काही राजस्थानी, मारवाडी, गुजराती बायांना पाहून आम्हा मुलींमध्ये ही चर्चा तर व्हायची की हिला बाहेरच काय दिसत असेल? किंवा नवरे त्यांच्या बायकांना कसे ओळखता ? फक्त डोक्यावरच्या पदरावरून बायकोला ओळखायचं? आणि अशा कहाणीला धरून इतका सुंदर चित्रपट करावा म्हणजे खासच! 


माझा एक ऑफिस सहकारी राजस्थानी आहे. त्यांच्यात गावाकडे सुनेचा पदर खाली पडला नाही पाहिजे अशी प्रथा आहे. त्याची बायकोही आयटी कंपनीत कामाला आहे पण तीही या गोष्टी पाळते आणि पुण्यात आले की मग दोघे नॉर्मल माणसांसारखे राहतात. 

समाज हा दिखावा आणि हे मुखवटे का घालतो? आणि हास्यास्पद म्हणजे फक्त बायकांनाच? याचं उत्तर खरच “भीतीपोटी” हेच असावं! 

- पूजा ढेरिंगे

(हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल) 

#लापतालेडीज #LapataaLadies #2023Bestmovie

लापता लेडीज: लो बजेट, क्वालिटी कंटेंट

by on एप्रिल २९, २०२४
पदराच्या आडून जगणाऱ्या बायांचं आयुष्य कसं दिसतं याचं पडद्यावर केलेलं रेखाटन कमाल ताकदीचं आहे. यासाठी किरण रावला सलाम! रविवारी इतका फ्रेश कंट...

हे बाप्पा... 

मनुष्याची शांतता तू...

आर्त भावनांचा अंत तू!

वेध अंतरीच्या वादळांचा,
दाता तू आत्म्यातील स्तब्धतेचा...

तूच भटकलेल्यांचा आधार तू!
माणसाला आकार दिलास तू,
त्यातून तुझ्यासारखाच 'माणूस नावी देव' जन्माला घातलास तू!

पण बघता बघता हा देव स्पर्धेतही उतरवलास तू...
नि बघता बघता मनुष्याच्या मायारुपी दुनियेने जन्म घेतला...

आज माणूस तुला मूर्तीत आकारतो,
स्वआत्म्यातील शाबूत कल्पनांना साकारतो...
कल्पनेतली आत्म्याच्या परिसाला मूर्त स्वरूपी ललकारतो.

हे बाप्पा,
शिल्पाचा तू घडवताना,
गुरु तुझ्यातला पुनः माणसाला, 'देव' घडवू लागतो...
तो कलाकारही मातीपासून देवच घडवू लागतो...

त्याचा तुला घडवण्याचा प्रवास नि तुझा माणसाला देव घडवण्याचा प्रवास, तुझ्या आगमनाने घरात येतो ...

विघ्नकर्त्यापासून विघ्ननाशक तू त्याला बनवत जातो...

घडवणाऱ्या जिवंत हातातून तू स्वतःला घरात नि घरापासून प्रत्येकाच्या टाळ्यापर्यंत नि त्या प्रत्येक टाळीतून त्यांच्या मुखापर्यंत नि मुखातून त्यांच्या आत्म्यापर्यंत जाऊन हक्काने विराजमान होतो नि पुन्हा थाटात भक्तांकडून म्हणवून घेतोस,
दरवर्षी घडवून मला, तू स्वतःतल्या माणसाला देव बनवतो...
त्यासाठीच,
माझ्यातल्या देवाला देव म्हणवू दे, तुझ्यातल्या माणसाला देव बनवू दे!
यावर्षी आणलस मला, पुढच्या वर्षीही लवकर येऊ दे!




हे बाप्पा ...!

by on सप्टेंबर ०१, २०१९
हे बाप्पा...  मनुष्याची शांतता तू... आर्त भावनांचा अंत तू! वेध अंतरीच्या वादळांचा, दाता तू आत्म्यातील स्तब्धतेचा... तूच भ...


आताच्या घडीला आमच्या पिढीतली प्रत्येक मुलगा/ मुलगी कशाच्या तरी शोधात आहे. ते शांत दिसले तरी ते शांत राहत नाही, ते रस्त्याने जात असतील तरी शांत राहत नाही, मुली जवळ बसले तरी शांत राहत नाही, ते शांत बसूनही शांत राहत नाही, ते एकटक पाहत असूनही शांत राहत नाही...
ते प्रत्येकवेळी कशाच्यातरी शोधात असतात... हा शोध कधीतरी डोक्याच्या अडगळीत पडलेल्या एक एक एक एक विचारांचा असतो तर कधी एकदाचा डोकं दुकानासारख बंद करणारा असतो... 

त्यांना मुलीला डेट वर न्यायचं, त्यांना कामही करायचं पण त्यांच्यावर घराची जबाबदारीही असते. हे सगळचं आधीही होतं पण तरी आता त्याला रूटीन मध्ये रमून चालत नाही. त्याला त्याचा बार शोधावा लागतो, त्याला रोज सोशली काहीतरी द्यावं लागतं. ऑडिएन्स वाढलाय त्याच्यासाठी त्याला रोज बलिदान द्यावे लागतं. सोशल मीडिया आलं तशा संधी आल्या तशी सगळ्यांची लागली. सतत डोक्यात हे करायचं ते करायचं, त्याच्यापेक्षा वेगळं कसं याच्यापेक्षा वेगळं कसं ... मग ओरिजनल कसं डूपलिकेट कसं ? ...
एवढं होऊनही सतत स्क्रीनच्या भिंतीवर तो सतत कशाच्या तरी शोधात असतो.

लोक त्याच्या प्रेमाला नावं ठेवतात, लोक तो आई वडिलांचा अनादर करतो त्याला नावं ठेवतात, लोक तो युट्यूबर, फोटोग्राफर आहे म्हणूनही नावं ठेवतात. या लोकांच्या नावांनी तो बेनाम होऊन भरकटत जातो.
त्याला फरक पडतो, नि पुन्हा मोकळ्या रस्त्यांवर शोधू लागतो तो काहीतरी... कशाच्यातरी शोधात तो सतत असतो...

रात्री शांत झोपणारी भारतीय संस्कृती आता मुलं चार चार पर्यंत जागता म्हणून फक्त ओरडते, कधीतरी त्या रात्रभर बसून एडिट केलेल्या व्हिडिओ पिसला बघावं ही स्पर्धा पॅशन ची जन्माला आली आहे ...
ही शांतता हवीय सगळ्यांना, अगदी नोकरी करणाऱ्यापासून बेरोजगारांना... सगळ्यांना गच्चीवर झोपून आकाशातल्या चांदण्या मोजायच्या पण आता गच्चीवर चार्जर नाही म्हणून तेही बलिदान करायला तयार झालो आम्ही, तरीही सूर्य उगवण्यापर्यंत सतत शोधात असतो कशाच्या तरी....

शेवटी तुझे घरचेच आहे, तुझ्यासाठी चांगलंच बघतील, म्हणणाऱ्यांना कसे सांगायचे, आता घटस्फोट फक्त मुलीच्या आडमुठेपणामुळे किंवा मुलाच्या दारू पिण्यामुळे न होता ऑनलाईन डेटिंग, ऑफिस सेक्रेटरी,  डिलीव्हरी बॉयमुळेही होतात. त्यामुळे खऱ्या प्रेमाच्या शोधात ते कधीच नसतात..  पण तरीही ते कशाच्या तरी शोधात सतत असतात.

एका क्लिकने आयुष्य बदलतं, एका क्लिक ने वाट लागते... भीती नेहमी याचीच असते त्यासाठी कायम डिप्रेस्ड राहून सतर्क राहावं लागतं. भावनिक राहून इथे भागत नाही, अभ्यासात मंद चालेल तंत्रज्ञानात अडून चालत नाही.
त्यामुळे डोकं त्यांचं आधीच्या पिढीत ठेवण्यापेक्षा त्यांना नवे मजबूत नि या पिढीत टिकून ठेवतील असे पंख बनवायला मदत करा नि मग खुशाल म्हणा, "मोठे झाले नि पंख फुटले यांना ...."
त्यांचा शोध चालूच राहील सतत अगणित, कारण त्यांचं विद्यार्थी होणं अखंड लांबलय. आधीसारखं थांबून घरचे सांभाळत नाहीत, आता ज्याचं त्याचं ज्याच्या त्याला उडावं लागतंय, त्यासाठी शोध हा कायम ठेवावाच लागतो, आयुष्यभर विद्यार्थी बनावच लागतं, जगाच्या भरकटलेल्या स्पर्धेत पडून स्वतःला शोधून जिंकावच लागतं .... शोध हा अखंड चालू राहील... 

- पूजा ढेरिंगे

सतत कशाच्यातरी शोधात आहे!

by on ऑगस्ट २८, २०१९
आताच्या घडीला आमच्या पिढीतली प्रत्येक मुलगा/ मुलगी कशाच्या तरी शोधात आहे. ते शांत दिसले तरी ते शांत राहत नाही, ते रस्त्याने जात असतील ...

खरंच एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ असणं, किती तोट्याच असतं. तो येऊन केवळ त्याचं दुःख शेअर करतो.
त्याचा वेळ मात्र तो इतरांना देतो. त्या इतरांना दिलेल्या वेळेतील दुःख, वेदना आणि उणेधुणे वाटण्यासाठीही पुन्हा आपण जवळचे बनतो. कधीतरी त्याचा वेळ मिळावा यासाठी त्रयस्थ बनाव वाटतं. एखादा अनोळखी सहकारी?

कारण सततच्या त्याच भूमिकेत राहून बोथट होण्यापेक्षा सुखातला तो बघता, अनुभवता यावा, ही मनोमनी दुःखद वेदना सलते कधीतरी हळूच. पण त्याला आपण नेहमीचे झालेले असतो आणि त्याच्या दुःखाच्या भावनांना आपली सवय ! एवढीच काय ती घट्ट मिठी हळूहळू उरते, कुरवाळली जाते, दुःखाची मिठी...! 

बघताना प्रियकर प्रेयसीचे नाते सुंदर वाटते. पण प्रत्यक्ष ते एकमेकांचे आधार बनतात, सोबती बनण्याची चूक ते करत जातात. प्रेमाच्या सुरुवातीला साथी बनण्याची स्वप्न मिळून पाहतात. स्वप्न साकार करू लागतात, एक-एक म्हणत आपापल्या करियरमध्ये उंची गाठतात, पण कधीतरी चुकून दोघे सोबत सायंकाळी नोकरीवरून लवकर घरी परतताना आवडणारा रोमँटिक पाऊस आता बालिश वाटू लागतो... लॅपटॉप भिजतो म्हणून त्या पावसात भिजण्याचा स्वांत आनंद त्या ढगात रिव्हर्स जातो. ओलावा निघून जाऊन त्याची ओल उरते केवळ!

शेवटी हळूहळू नोकरीच्या आधीन होऊन नातं सुटत जातं. पण नातं तुटत नाही. प्रेम संपलेल नसतंच कधी, ना ते संपाव अशी मनी भावना येते. यात मात्र कधीतरी त्याचं प्रेम उफाळुन येतं तेव्हा ती कामात व्यग्र असते, तर कधीतरी तिचं प्रेम उफाळुन येतं तेव्हा तो मग्न असतो. प्रेमाच्या प्रोपोजच्या क्षणी आयुष्यात एकदाच आणि शेवटचं प्रियकर प्रेयसी या दोघांना एकावेळी प्रेम होतं. त्यानंतर एकदा एकाला तर दुसऱ्यांदा दुसऱ्याला. त्यामुळे कधीतरी दोघांचा एकमेकांना वेळ मिळावा, यासाठी त्रयस्थ बनाव वाटतं.

नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे ' जवळचे ' होण्यापेक्षा त्याचे सहकारी व्हावं वाटतं. "सहकाऱ्यांसाठी नाते फेक असते, प्रेम करणाऱ्यासाठी नाही" हा आनंद प्रेम करणाऱ्याने आतून कितीदा वाटून घ्यावा?. सगळ्याच गोष्टींची उकल त्याच्याकडे येऊन केली जाते पण त्यात सगळचं रुक्ष आणि कोरडे असते.  प्रेम करणाऱ्याला त्याचा आनंद, त्याचं समाधान आणि शांत तो कधीच अनुभवता येत नाही.
चंद्राचं नेहमी आकाश होण्यापेक्षा चांदणी व्हावं वाटतं!
मंदिरातला देव होण्यापेक्षा एक भक्त व्हावं वाटतं... !
मंदिराला भक्तांची आस असते, देव रोजचाच झालेला असतो. ! त्यामुळे कधीतरी फक्त कधीतरी
सोबत्याचा आधार होण्यापेक्षा सोबतीन व्हावं वाटतं! 

- पूजा ढेरिंगे
इमेज सोर्स: इंटरनेट

दुःखाची मिठी!

by on ऑगस्ट २४, २०१९
खरंच एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ असणं, किती तोट्याच असतं. तो येऊन केवळ त्याचं दुःख शेअर करतो. त्याचा वेळ मात्र तो इतरांना ...

४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता तर सरकारला तेवढाच हातभार लागला असता.
आणि अक्षयने तेवढी मदत केलीच असती नाही?
तर्र...
मिशन मंगल यासाठी पहावा...
आजपर्यंत जे विज्ञानात शिकवले ते बाऊन्स गेलंच होते. परंतु यापुढे चंद्रयानसारखे प्रयोग जेव्हा देशात घडतील, तेव्हा बातम्या ऐकून त्यामागचं रसायन, त्याची मूलभूत रचना तुम्हाला माहिती असेल. अंदाज येईल की, एका सॅटेलाईटमध्ये कितीतरी रॅकेट बसविले जातात, पण त्याकरिता डिझायनिंग, प्लॅनिंग, व्यवस्थापन, बॅटरी, ऑटोमॅटिक सुईंग कपडा/ इतर घटक, छोट्या जागेत सगळे तंत्रज्ञान बसविणे, कॅमेराचा वापर, इंधन आणि मुख्यत्वे वातावरण या सगळ्याचे काय महत्व असते. चित्रपटापूर्वी याची मला खरंच कल्पना नव्हती. हे जरी गुगल बाबाकडे उपलब्ध असले तरी ते वाचण्यापेक्षा मनोरंजनाचा टच असलेल्या सिनेमाकडून ते कळत असेल तर ते जाणून घेण्यात साहजिक उत्सुकता वाटते. शिवाय प्रत्येक दृष्यानंतर वेगवेगळे भाव अनुभवायला मिळतात. आणि शेवटच्या दृष्य्यात संपूर्ण थिएटरात सन्नाटा, जॉ ओपनिंग मुमेंट आणि गर्व अनुभवायला मिळतो. ते वेगळंच!
का पाहू नये?
देशभक्ती जागृत झाली म्हणून जाऊ नका. शेवटी चौकीदारच्या आवाजातल्या चार ओळी ऐकायला लागतात आणि दुर्दैवाने मिशन मंगलचे क्रेडिट त्यांनी घेतले होते, तो क्षण आठवतो. बाकी, अक्षय कुमारच्या मोदिमय असण्याला बाजूला ठेऊन हा चित्रपट पाहताना अक्षय खरंच हँडसम वाटतो...

चित्रपटाबद्दल :
सेमी बायोग्राफिकल सायफाय फिल्म असलेला मिशन मंगल सिनेमा विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, निथ्या मेनेन, कृति कुल्हारी, शर्मन जोशी, हरिहर दत्तात्रेय आणि अक्षय कुमार या सगळ्यांचा. 
पण हे मिशन मिसाल झाले ते राकेश धवन, तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांमुळे.

पात्र:
‌वर्षा पिल्लाई (निथ्या मेनेन) :  जी टीममधील इतर शास्त्रज्ञांपैकी जाडी असते, त्यावर फॉर्म बघताना विद्या अक्षयला म्हणते कुछ जादा मोटी नहीं? आणि त्यालाच जोडून ती हळूच म्हणते, "ये बोलने का मुझे हक नहीं | "
हे संभाषण तेव्हा प्रभावी वाटते जेव्हा आपल्याला आठवते की, काही दिवसांपूर्वी विद्यालाही बॉडी शेमिंगमुळे ट्रेण्ड केले जाते. त्यामुळे या वाक्यात इमोशन जाणवून त्यावर तिने सफाईदारपणे तिची बाजू मांडल्यासारखे भासते.
याशिवाय, पिल्लाई यांची सासू नातू व्हावा म्हणून खडूस झालेली असते... ही एक युनिक शास्त्रज्ञ असते जी गर्भवती होऊन मंगळ प्रोजेक्टसाठी काम करण्यास सुरुवात करते. 

‌दुसरी असते कृत्तिका अगरवाल (तापसी पन्नू) : लेफ्टनंट असलेल्या नवर्याला फिल्डवर दुखापत झाल्यामुळे चिंतेत येऊन ती या प्रोजेक्ट मधून माघार घेते. पण नवरा देशभक्त म्हणून तिचं या मिशनचा भाग होणे सहज शक्य होते. 

‌नेहा सिद्दीकी (कृति कुल्हारी):  जी मुस्लिम दाखवली असून तिच्या नवर्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे ती हॉस्टेलवर राहू लागते. परंतु एकटीसाठी घर शोधताना तिच्या जातीमुळे तिला कोणीच घर द्यायला तयार नसते. 

‌एका गांधी (सोनाक्षी सिन्हा): जी अनाथ असते पण इस्त्रोकडून तीन वर्षाचा अनुभव घेऊन तिला अमेरिकन नासा मध्ये जाण्याची इच्छा असते.  

‌परमेश्वर (शर्मन जोशी) : हा आजही ३ इडिएट्समधीलच राजू आहे.  त्याच्याशिवाय हा रोल कुणाचाच नव्हता. 

अनंत अय्यर (हरिहर दत्तात्रेय): हा व्यक्ती वयाच्या मानाने अधिकच भाव खाऊन गेला. कमी वेळ आहे पण जास्त आहे तेही. 

आणि शेवटी उरते ती तारा शिंदे (विद्या) प्रोजेक्ट डायरेक्टर आणि ती उरतेच! मनात आणि शरीराच्या नसानसांत तिचं चैतन्य स्फुरते आणि वाटते, गृहिणी म्हणजे कमीपणा नाही. बॅक ऑफ द माईंड स्वप्न सतत चालू असावं. त्यामुळे इस्रोची स्त्री असो वा कुठलीही तिचं घर तिचीच जबाबदारी असते.  

या पाच स्त्रिया, तीन पुरुष आणि १७ हजार शास्त्रज्ञांच्या मिशनला मॉम हे नाव दिलं जाते... 

फिल्म अप्रिसिएशन : 
कॉमेडी, वास्तविकता, संगीत, कथा लेखन, स्क्रिन प्ले, पात्र, एकसंगती आणि या सगळ्यांची जुळून आलेली ही साखळी खऱ्या अर्थाने पॅकेज आहे. 
पण चित्रपटाची नेमकी सुरुवात कुठून करायची हे किती मोठं आव्हान असेल, नाही?. कारण विषय तितका शास्त्रीय आहे. लोकांना समजावा असा विचार करून संहिता लेखन ( स्क्रिप्ट रायटींग) करणं म्हणजे लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं आहे. पण मंगळवर जाणाऱ्या टीमची खासियत होती की, "होम सायन्सने मंगळावर जाणे शक्य आहे. होम सायन्सने रॉकेट सायन्स शक्य... !" या समिकारणाला समोर ठेवत प्रत्येक चलचित्र जोडले गेले आहे.
त्यामुळे सुरुवात होते विद्याच्या वैयक्तिक आणि संसारी  आयुष्यापासून ... या पहिल्या सिनमध्ये तिचा नवरा पूर्वग्रहदूषित दाखवला असून तो घरातील सगळ्या गोष्टीवर नियंत्रित ठेवण्याचा दिखावा कम प्रयत्न करतो. एक मुलगा आहे, ज्याला ए आर रेहमानसारखा सुफी संगीतकार व्हायचे म्हणून तो मुस्लिम धर्माला फॉलो करू लागतो. कारण त्याला वाटते मुस्लिम धर्मांतर केले तर आपण सहज ए आर रेहमान बनू शकतो, एक सासरे आहे ज्यांना सुनेच्या कामाची कदर आहे आणि एक मुलगी आहे जी पाश्चात्य संस्कृती फॉलो करणारी आहे. या सगळ्यांची मॉम आहे तारा शिंदे. पण, या शास्त्रज्ञाची खासियत आहे, तिची कशाबद्दल तक्रार नाही. कारण तिचे स्वप्न तिचा फोकस आहे. पण म्हणून चूल आणि मूल या ओझ्याखाली न राहताही घरातील सगळी कामे आवरून इस्रोला जाते.
विचार येतोच मनात, हे शक्य आहे का ?

आणि सुरुवात होते चित्रपटाला... 

चांद्रयान सॅटेलाईट अवकाशात सोडणाऱ्या दृष्यापासून. पण हे मिशन अयशस्वी ठरते, याचे नेतृत्व राकेश धवन (अक्षय कुमार) करत असतात. मिशन अयशस्वी होण्यामध्ये काही अंशी विद्या बालनने केलेली चूक कारणीभूत ठरते. कारण सॅटेलाईट अयशस्वी होण्याच्या कारणांपैकी 'हवामान' हे एक कारण असते, ते त्यावेळी समजत जाते. त्याशिवाय एक अयशस्वी सॅटेलाईट किती नुकसान करते, तसेच मिशनवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी अशी परिस्थिती म्हणजे 'जगा किंवा मरा' अशी असते... हे पहिल्या सिनमध्ये जाणवू लागते.
हळूहळू मन विद्या बालन होऊन चित्रपट पाहू लागतं.
पहिल्या अयशस्वी सॅटेलाईट लॉन्चिंगनंतर इस्रोब्रांच भारतातून नासामध्ये गेलेल्या व्यक्तीला दलीप ताहीलला पुढील मिशनसाठी बोलावते. तेव्हा आपलीच लोकं ज्याप्रमाणे नासासमोर इस्रोची तुलना करतात, ते मनाला दुःख देणारे ठरते. 

परंतु अयशस्वी मिशनमुळे धवन यांना कुचकामी मिशन मंगळवर पाठविण्यात येते. या अपयशामुळे इस्रोचे प्रमुख जेव्हा अविश्वास दाखवता तेव्हा धवन म्हणतो, संशोधक आहे, म्हणून काहीतरी शोधायचं म्हणत "आजपर्यंत कुठलाच छंद नाही ना नाती जपली मी. आता अचानक अस झाल्यानंतर लग्न करू का? " ही उपरोधिक ओळ विचार करायला भाग पाडते.

अपयशामुळे राकेश धवन निराश झालेला असतो. ताराही तिच्या संसारात लक्ष देऊ लागते. पण तिला तिच्या चुकीची कायम रुखरुख लागून राहते. त्यामुळे एकदा घरात गॅस संपल्यानंतर तापलेल्या कढईत बंद गॅस करून सगळ्या पुऱ्या तळल्या जातात, तेव्हा अचानक तिच्या डोक्यात कल्पना येते. हे शक्य आहे मिशन मंगलच्या बाबतीत. !
आणि ती वेड्यासारखी सुट्टीच्या दिवशी धावत पळत  धवनकडे जाते आणि अशक्यप्राय ते होम सायन्सने शक्य करून सांगते. 

तेव्हा धवन तिच्या प्रयोगावर हसतो, कारण यान पाठविणे पुऱ्या तळण्याईतके सोपे नाही, अशा कल्पनेवर सुरू झालेला हा विचार आता मात्र धवनसह इस्रोचे प्रमुख ही गांभीर्याने घेऊ लागतात. तेव्हा धवन म्हणतो, "प्रत्येक शास्त्रीय यश हा पहिले विनोदच असतो."
प्रेक्षक संपूर्ण शास्त्रमय होऊन जातो.
अकरा महिन्यांचा कालावधी देऊन आणि आठशे करोडचे बजेट देऊन हे मिशन पूर्ण करण्याची परवानगी त्यांना मिळते. एवढ्या कमी बजेटमध्ये हे अशक्य असते. परंतु तरीही काम सुरू केले जाते. नासाच्या माणसाला मिशन मंगल या मिशनसाठी वैज्ञानिक टीम निवडण्याची जबाबदारी दिली जाते. तो काळजीपूर्वक अनुभव नसलेली टीम मिशनसाठी निवडतो.
टीमही सुरुवातीला धवन आणि ताराला वेड्यात काढू लागते. सतत अशक्यचं तुणतुणं वाजवू लागते.
कारण मंगल मिशन तारासाठी स्वप्न, पण इतरांसाठी नोकरी असते. त्यामुळे सुरुवातीला काम नीट होत नाही. लोकांप्रमाणे या शास्त्रज्ञांनाही नोकरीसारखे हे काम करून संपवायचं असतं. 
शिवाय मंगळावर जाण्यासाठी अमेरिका ४ वेळा आणि रशिया ८ वेळा अयशस्वी ठरलेली असते..त्यामुळे अमेरिकेला नाही जमलं ते आपल्याला जमणार? हा अविश्वास सोबतीला असतो. आणि चंद्रावर जाणे सोप्पे आहे कारण चंद्र पृथ्वीचा उपग्रह पण मंगळवर जायला गुरुत्वाकर्षण शक्ती पार करावे लागते. 
या सगळ्याची कल्पना या टीममधील प्रत्येकाला असते. त्यातच त्यांच्यासाठी दह्यात साखर म्हणून, शासनाकडून पैसे मिळण्यास नकार मिळतो, त्यामुळे चंद्रयान २ कडे लक्ष दिले जाते.  त्यामुळे सगळे खोटे सांत्वन देऊन राजीनामा देतात.
तारा आणि राकेश हे स्वप्न सोडण्याच्या मार्गावर असतात. पण तेव्हा ताराच्या डोक्यात सुपीक कल्पना येते, धवन ही कल्पना इस्रो प्रमुखांना कळवतो, डॉ. अब्दुल कलाम यांच्या आदर्शाने सगळ्यांना कन्व्हेयन्स करतो. शेवटी साडेचारशे करोडमध्ये हे मिशन करायला इस्त्रोवाले परवानगी देतात. (मिशन पूर्ण होण्यासाठी ४४८ करोड लागतात. त्यामुळे मंगळ यान टीम प्रत्यक्षात दोन करोड सरकारला प्रामाणिकपणे रिटर्न करते.)
आणि सगळे खाच खळगे दूर करत मिशनला सुरुवात होते. मग 'हे अशक्य आहे' पासून सुरू झालेलं मिशन 'कॉपी दॅट' पर्यंत पोहोचते... 
या मिशनमध्ये सहभागी झालेला रादर कुठलाही शास्त्रज्ञ डोक्याच्या प्रत्येक भागातील प्रत्येक कल्पनेला कोणत्या प्रकारे अनुभवतो हे पाहण्यासारख आहे. या सगळ्यामध्ये विद्याचा आत्मविश्वास आणि ऊर्जा... वाह... टाळ्या वाजवत इतक्या... आणि अक्षरशः थिएटरमध्ये खरंच तीन सिन्सच्यावेळी टाळ्या वाजवल्या जातात.

शेवटचा सिन :
प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येकाच्या मेहनतीनंतर जेव्हा ते तयार होतं तेव्हा किती भीती पण किती गर्व वाटतो मनात. 
आणि तिन्ही गाण्याचे कौतुक करावे ते कमीच. प्रत्येक गाणं हे त्या मिशनला पूर्ण होण्याची फिलिंग देणारे आहे.
एवढे असूनही शेवटच्या क्षणी मात्र पावसामुळे आणि प्रतिकूल वातावरणामुळे मिशन पुढे ढकलले जाते. बॅक अप प्लॅन म्हणून पाच दिवसांचा कालावधी हातात असतो. तेवढ्या वेळात वातावरण स्वच्छ होणे आवश्यक असते. त्यामुळे पहिल्या दिवशी कामातून विश्रांती म्हणून पार्टी होते, सगळे रिलॅक्स होतात. पण लगातार पाचही दिवस पाऊस थांबत नाही..
५ नोव्हेंबर शेवटची संधी असते पण तेव्हाही पाऊस थांबलेला नसतो. सायंकाळच्या वेळी मिशन अबॉर्ट म्हणत सगळे माघारी जातात. कारण त्या दिवशी झाले नाही तर पुढचे कितीतरी वर्ष वातावरणामुळे शक्य होणार नसते. त्यामुळे ही शेवटची संधी असते, पण निसर्ग अडून असतो. धवन निराश होऊन परतू लागतो तोच, शेवटच्या क्षणी सगळे आकाश साफ होऊन सूर्य उगवतो. श्र्वासाचा विलंब न करता तो मिशन पुन्हा सुरू करतो... सगळ्या लेडीज तिथेच असतात. आणि
"गो सर, गो सर, गो सर... अँड येय... फायनली..."
२४ सप्टेंबर २०१४ ला योग्य वातावरण आणि योग्य वेळी यान मंगळावर पाठवले जाते.
सगळीकडून आनंद, शुभेच्छा, अशक्य ते शक्य अशी खूप स्तुतीसुमने उधळली जातात.
पण...
पण...
एका पॉईंटला यान रेडिकल्सला धडकल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती पार करून मंगळाच्या कक्षेत गेले की नाही हे दिसनेच अशक्यप्राय होते.
मनात हुरहुर, उत्कंठा... शिवाय मनात एकदाही येत नाही की, हे मिशन तर यशस्वी झालंय माहिती ना आपल्याला तरी कशाला हुरहुर लावून घ्यायची. कारण चित्रपटाची आणि स्क्रीन प्लेची ताकद इथे कामी येते. स्क्रिन वरून नजर हटत नाही...
अँड दॅट हिरॉईक ममेंट !
एखाद्या साऊथ इंडियन चित्रपटमध्ये दाखवतात तसे
सॅटलाईट स्लो मोशन मध्ये एंट्री करते. आणि थिएटर चा माहोल पाहण्यासारखा असतो.
सगळ्यांचे आवंढे आणि मनातील धाकधूक शांत होते. आणि हळूहळू टाळ्यांचा आवाज येतो ...
काबिल हैं भारत तू! इतकं सुंदर वाटून जातं सगळचं.
फक्त शेवटी मोदींच्या आवाजातली ऑडीओ क्लिप दाखवायला नको होती, ना? एखाद्या शास्त्रज्ञाचा बाईट अजुन शोभा वाढवणारा ठरला असता, असे वाटले.
#पहावाअसानाही_पहावाचअसाआहे
- पूजा ढेरिंगे

अँड दॅट हिरॉईक ममेंट !

by on ऑगस्ट २१, २०१९
४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता तर स...


खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्रेमाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जवळ करते. एखाद्या कलाकाराने असंख्य हृदयाचं प्रेम बनणे, ही गोष्ट किती भाग्याची असते.
इतरांसाठी कुणीही असो पण माझ्यासाठी उर्दुची डिग्री देणारा हा प्रोफेसर आहे. तो फक्त माझ्यासाठी तसा नाही, तो मीना कुमारी यांच्यासाठी सुद्धा एक उर्दूचा जादूगार होता. अनेकजण एकलव्य होऊन या अवलीयाकडून आयुष्याच्या परे जाऊन काहीतरी शिकतात. जिवंतपणी एवढं भरभरून देणारा हा पहिलाच व्यक्ती असणार. लोकांना मेल्यानंतर वाचलं जात, पण याने प्रत्येक भावनेला न्याय देऊन स्वतःच्या अंतरंगात पाहायला शिकवलं.
गुलजार यांचे खरे नाव संपूरणसिंग कालरा. पेशाने फिल्म दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, कवी आणि संहिता लेखक असलेला हा शेर भारतीय चित्रपट सृष्टीसाठी वरदान ठरला. पाकिस्तानच्या दिना (पंजाब) येथे जन्मलेला हा शेर भारत-पाक फाळणीनंतर भारताची राजधानी दिल्ली येथे स्थायिक झाला. सुदैव भारतीयांचे की गुलजार यांनी मातृभूमी म्हणून भारताची निवड केली. फाळणीनंतर गुलजार कधीच जन्मभूमीकडे गेले नाही. पण ७० वर्षानंतर त्यांनी दिना या जन्मभूमीला भेट दिली. 
याबाबत गुलजार म्हणतात, "लहानपणीचे आठ वर्ष दिनामध्ये घालविल्यानंतर फाळणी दरम्यान आम्ही सुरक्षित भारताची निवड केली. हे आयुष्य चक्र पूर्ण होण्यासाठी शेवटचं 'दिना'ला जाणे गरजेचे होते. पण कदाचित ही जन्मभूमिला दिलेली शेवटची भेट असेल."
सुरुवातीच्या मेहनतीच्या काळात त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम केले. त्यानंतर त्यांच्या करियरची सुरुवात बंदिनी या चित्रपटाने झाली. मेहनतीच्या काळात त्यांनी चित्रपट सृष्टीला इजाजत, आंधी, कोशिश हे चित्रपट तर, तुझसे नाराज नहीं जिंदगी, मेरा कुछ सामान, जय हो, तेरे बिना जिंदगी से कोई, आनेवाला पल हे प्रेमाने गच्च भरलेले लेजेंडरी गाणे दिले.
गुलजार यांचे चित्रपट पाहताना लक्षात येते, ते नेहमी 'फ्लॅशबॅक'चा वापर करतात. याबाबत ते मानतात, आयुष्याप्रमाणे चित्रपटही भूतकाळाशिवाय अपूर्ण आहे. अशा प्रत्येक शब्द, फ्रेम आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ आहे, तो अर्थ म्हणजे या व्यक्तीचं त्याच्या कलेतून व्यक्त होणं आहे.

पण असे म्हणतात, "एक कलाकार कधीच एक फुल-टाईम जीवनसाथी बनू शकत नाही. कारण त्याचं पहिलं प्रेम त्याची 'कला' असते, त्यानंतर इतर सगळे..." तसेच राखी मुजुमदार आणि गुलजार या जोडप्याचेही झाले. राखी म्हणजे करण अर्जुनमधील शाहरुख, सलमानची आई...
गुलजार आणि राखी यांचे लग्नानंतर वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात सेटवरही भांडणे होऊ लागली आणि त्यावेळी गुलजार यांनी राखीवर हातही उचलला होता. त्यातूनच त्या दोघांचा घटस्फोट झाला पण त्यानंतर लगेच एका वर्षाने राखी आणि गुलजार यांचा अंश म्हणून, आपल्या वडिलांची प्रत्येक कला आत्मसात करून आणि वडिलांची भूमिका अधिक ठासून जगासमोर आणणाऱ्या मेघना गुलजार हिचा जन्म झाला.
गुलजार वडील असतील तर हर जर्रा 'गुलजार'ही बनेगा।
तीही एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बनली. तिने २०१८ चा अवॉर्ड विनर' राझी ' प्रेक्षकांना दिला. मेघना हिने गुलझार अधिकाधिक कळावे आणि ते जीवंत असतानाच कळावे याकरिता आत्मचरित्र म्हणून " कारण तो आहे ---- (बिकॉज ही इज ...) " हे पुस्तकही लिहिले.
तरीही मी मानते, एखाद्या आवडत्या कलाकाराची फक्त कला पहावी. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावले की वास्तविकता दिसते. पण कलेत त्याचा आत्मा दिसतो, वास्तविकतेत त्याच्या कृतीचे प्रतिबिंब. त्यामुळे
"किसीको इतना गहराई तक भी ना जानो कि पानी की सुंदरता देखने की बजाए, कुए की बदसूरती दिखाई दे। "
या शायद...
"खूबसूरती ज़र्रे को जानने में हैं, पूरे शरीर की सुंदरता एक दिन खत्म होनी हैं।"
आणि म्हणूनच गुलजार यांच्या जन्मदिनी व्यक्तिशः समजून घेताना वास्तविक आयुष्य कळले पण मला त्या कलाकाराच्या वैयक्तिक गोष्टीवर म्हणजेच कलेवर प्रेम आहे, त्याच्या कुठल्याच वास्तविक घटनेवर नाही.
इसलिए,
वो एक उर्दू पढ़ाव हैं, तो शिष्य मैं हूं।
और दुनिया में,
कोई जिंदा ख्वाब हैं तो वो 'गुलजार' हैं।
- पूजा ढेरिंगे

कोई जिंदा ख्वाब हैं तो वो 'गुलजार' हैं।

by on ऑगस्ट १८, २०१९
खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्...

उशीर झाला थोडासा, पण आज एैतवारी काहीतरी पहावं म्हणून लॅपटॉपवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिका लावली.
मध्यंतरी भ्रमंतीच्या वेळी एका हॉटेलात ही मालिका मोठ्या रसिकतेने चालू होती. मालिकेत चालू असलेले शाळेतील एक दृश्य पाहून मन थबकल होतं. शिवाय, आंबेडकर हे आजवर दलितांचे, संविधानाचे आणि अस्पृश्यांचे... इथवर माझी नि त्यांची समाजाने करून दिलेली ओळख होती.
त्या पलीकडे ना ते माझ्या वाट्याला आले ना मी त्यांच्या वाट्याला गेलेले. पण आज वाटलं ते यामुळे की पत्रकारिता शिकताना बऱ्याचदा शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांच्या मूकनायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचा नमुना पाहिल्यानंतर मनाची उत्सुकता जाणून घेण्याच्या शिगेला पोहोचलेली.
त्या माणसाने जे केलं होतं, ते आजही कुणी करायला धजावत नाही... कारण ज्याप्रमाणे त्या माणसाला त्याच्या लहानपणी या जाती व्यवस्थेचा शिकार व्हावं लागलं तसं आता होता येत नाही. आताची परिस्थिती ही काही बरी नाही. पण वेगळी आहे.
मनात हे थोडेफार विचार चालूच होते. तेव्हा आईने विचारलं, "काय लावतेस?"
तिला सांगितलं, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर..."
परंपरागत चालत आलेल्या विचार साच्याने तिनेही तितकीशी स्वीकारार्हता दाखवली नाही. पण तरीही मी माझा निर्णय अढळ ठेवला.
सुरुवात केली... मालिकेत पुल देशपांडे यांच्या चित्रपटात भूमिका साकारलेला सागर देशपांडे दिसला. आई म्हणाली, हा तर देशपांडे चित्रपटातला दिसतोय.
तेव्हाच मलाही क्लिक झालं. मग मालिका सुरू झाली, सुरुवात ही आंबेडकरांच्या विचारांनी, संविधानाने आणि नंतर हळूहळू शाहू महाराजांच्या भेटीने होते.
शाहू महाराजांच्या भेटीतून उलगडत जातात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे जीवन पैलू.
"सैन्य भरतीत अस्पृश्याना बंदी" हा नवा निर्णय जेव्हा जाहीर केला जातो तेव्हाच जन्म होतो भीमरावचा... नि सुरुवात करतानाच आंबेडकर म्हणतात, माझा जन्मच 'अन्यायाच्या' दिवशी झाला. तेव्हा या अन्यायासाठी जन्मणार वादळ कसं असतं, याची प्रचिती येण्यासाठी खऱ्याखुऱ्या वादळाची चाहूल प्रसूतीच्या दृष्यातून साकारली जाते.
तेव्हा सुरू होतो, लहानग्या भीमाचा प्रवास. त्यात येणारी वादळे, नि वादळांपेक्षाही आपल्या सारख्याच देहाच्या माणसांकडून मिळणारी वागणूक आणि त्या वागणुकीतून लहानग्या जीवाला पडणारे असंख्य बोचक प्रश्न.
"महार म्हणजे काय रे आनंदा? किंवा बाट म्हणजे काय? मग उच्च जाती म्हणजे कोण आणि आपल्या अंगाला घाण लागलेली असते का?" या प्रश्नांचा संच इतका बलाढ्य आहे की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य टोकाला नेऊ शकतं. ही वागणूक आपल्याला दिली तर? एवढा कचरत विचार माझ्या मनात आला नि माझा प्रवास मी आंबेडकर म्हणून सुरू केला. त्या मालिकेतला आंबेडकर केवळ बघण्यापुरता म्हणून तरी जगून पाहू अशी धारणा मनी केली आणि बघू लागले.
कारण जेव्हा दुःख आपलं होतं तेव्हा सगळचं योग्य वाटतं. तेव्हा खरा चटका कळू लागतो, चटक्याचा त्रास होऊ लागतो.
हा चटका लागतो, जेव्हा आर्मीतील रिटायर्ड शिक्षक म्हणजे वडील रामजी जात समजू नाही म्हणून त्यांचं सकपाळ आडनाव बदलून गावाच्या नावावरून ' अंबवडेकर' आडनाव लावतात... या अंबवडेकरने दिवस सरू लागतात, पण आता भीमाला शाळेत टाकण्याचा दिवसही समोर येतो. वडील भीमा आणि आनंदाला शाळेत नेतात. शाळेतील मास्तर गुरुजी म्हणजे आंबेडकर गुरुजी यांच्याकडे ते प्रवेशाची चौकशी करतात. नाव - आडनाव सांगेपर्यंत गुरुजी नेहमीसारख्याच मूडमध्ये असतात. पण जेव्हा शालेय पटावर 'जात' टाकणं अनिवार्य असतं, तेव्हा मात्र रामजी ' महार ' म्हणतो. तोच गुरुजी म्हणतात "ठीके ठीके, उद्यापासून त्यांच्या सोबत बसणं द्या आणि शाळेत पाठवा.!"
भिमजी आणि आनंदपासून मुले आजूबाजूला पळतात, दूर बसू लागतात, स्वतःच्या डब्ब्यातला खाऊ देत नाही, खेळायला घेत नाही, कचरा टाकतात, तू शिवला तर तीनदा अंघोळ करावी लागेल म्हणून मनावर जातीचा पगडा घट्ट करू लागतात... असं पोळणारं वास्तव, त्या वास्तवाचे निखारे इतके का कठोर की खरा जाळ इतका पोळत नसेल... अन् इथून सुरू होतो प्रवास भिमारावाचा!
या ऐतवारी लावलेल्या या मालिकेने जास्त काही नाही, मनोरंजनाच्या या प्रयत्नांमुळे किमान घरातली माय हे पाहू लागली, तिला गोडी लागली. तिला त्या लहानग्या भिमात नि त्याला सोसाव्या लागणाऱ्या वेदनेत तिचं मुल दिसलं, तिला त्या समाजातील लोकांच्या वागणुकीची कणव आली, तिला राग आला, द्वेष आला, माणूस म्हणून तिने मला मोठं केल्याचा अभिमान हळूहळू बळावत चालला. तिने तिच्या मुलींच्या विचारांचा मजला आंबेडकर विचारांचा केल्याचा तिला अभिमान वाटला. जोपर्यंत प्रत्येक समजातल वास्तव समोर येत नाही, नि त्यातली अढी सुटत नाही, तोवर हा समाज एकमेकांपासून जातींच्या किडीने किडत जाणार. त्याला एकत्र करायचं असेल तर प्रत्येक धर्माला मनापासून स्वीकारणं जमायला हवे, आणि या बदलाची सुरुवात ' स्व_पासून करायला हवी. जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या जातीला बनुनही पाहता येतं तेव्हा आपल्याला माणूस होता येतं. कारण प्रत्येक धर्माचा संघर्ष वेगळा निर्माण झालाय, त्या समाजातला माणूस एकसंध सांधायचा असेल तर त्यासाठी हे छोटे छोटे बदल स्वीकारायला हवे.
हे बदल इतके स्वीकारायला हवे की एकेक जात मुळासकट नष्ट होऊन लाल रक्तसारखा समाज उरायला हवा, आडनाव नाही, ना त्याला चिकटून येणारी जात. जे उरावं ते निखळ नि माणूस म्हणून एकमेकांना प्रेरित करणार असावं!
कारण खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे!


दोन वर्षांपूर्वी पत्रकारिता शिकायला सुरुवात केली होती. हे दोन वर्षाचं शिक्षण तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न असतो. पत्रकारिता शिकतेय म्हणजे बातमीदार होणं किंवा टीव्हीवर झळकन एवढंच नसतं, हे मला पत्रकारितेमुळे समजले. त्यामुळे आपला आवाज, आपली पत्रकारिता किंवा आपला चेहरा, आपली पत्रकारिता म्हणण्यापेक्षा आपली भूमिका आपली पत्रकारिता असते.

पत्रकारितच्या पदवीसाठी शिक्षण घेणारी पोरं अगदी कोवळी असतात. त्यांना पत्रकारिता म्हणजे लोकमान्य, आगरकर, आंबेडकर, जांभेकरांच्या काळातली वाटते. पण दुर्दैवाने तेही अनेकांना माहीत नसतात. पण तरीही कुठलीच मागासलेपणाची रेषा मनात नसते. कारण हे दोन वर्ष त्यासाठीच असतात. शून्यापासून सुरुवात करून या ज्ञानशून्य शरीराची नापीक जमीन सुपीक करायची असते. पण वेगळेपण असते. प्रत्येकचं गोष्ट अभ्यासण्यासारखी असते आणि प्रत्येक गोष्टीत दडलेला एक गाभा असतो एक खूप काळापासून दडलेला आत्मा असतो, याचा पाठपुरावा या दोन वर्षात होत असतो. 
कारण हि दोन वर्ष म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मनोरंजनात्मक, सिनेमात्मक, असे बरेच पैलू समोर आणणारे असतात. यातून हळूहळू आपली आवड आपल्याला खुणावत राहते आणि शेवटी एखादा हिरा आपल्या या नापीक जमिनीत रुजू लागतो. रोज खतपाणी मिळाल्यामुळे आणि तारुण्यातील ऊर्जेमुळे नापीक जमीन गुळगुळीत होऊ लागते. जेवढं स्वीकारता येईल स्वीकारू लागते.
त्याच दिवशी टीव्ही जर्नालिजम शिकवायला बाई येतात. टीव्ही बद्दल कमालीचं आकर्षण हि भारतीयांची एकमताची बाजू.
बाईंनी बेसिकपासून सुरुवात केली. कोणत्या भाषेतून शिकवले तर चालेल?
बहुमताने सगळे ओरडले, मराठी...
पण इतर भाषिक मुलेही असल्यामुळे हिंदी-मराठी असं द्वैभाषिक शिक्षण सुरु झाले. बाईंनी प्रश्न विचारला, वृत्तवाहिन्यांवर काय पाहता?
आम्ही सगळे सुरु झालो, चला हवा येऊ द्या, रोड़ीइज, नागीण, गाणी, पोगो, क्रिकेट आणि एकजण म्हणाला, रवीश कुमार प्राईम टाइम... 
मला आजही आठवतं तो एकटाच विद्यार्थी होता, जो रविशला प्रत्येक पावलावर फॉलो करत होता... स्वतःशिवाय दुसऱ्या कुणाचा इतका चाहता होणं मला पटायचं नाही. पण बाईंनी त्याची दाखल घेतली नि रवीशमुळे माझ्यातला हा 'स्व'चा न्यूनगंड नकाबसारखा खाली पाडला.
पत्रकारिता शिकत असल्यामुळे वर्गातच चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, वृत्तवाहिन्यांवरील विशेष स्टोरीज हे बघणं म्हणजे शिक्षणाचा भाग होता. बाईंनी रवीश कुमारचा "प्राईम टाइम" सुरु केला.
आयुष्याच्या एवढया कठीण आणि जबाबदारीमुळे वाकलेल्या प्रत्येक मनुष्याला कुठेनाकुठे आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागतेच. पण रवीश कुमार रवीश कुमार राहिला. यात वाटा आणि आधार एनडीटीव्हीचाही होताच. रवीशच्या विश्वासावर आत्मविश्वास दाखवणं तेही या स्पर्धेच्या काळात, हे महत्वाचं होतं... नि प्राईम टाइम सुरु करत, दिल्लीच्या शांत थंडीत एक साधारण आवाज येतो  आणि या वातावरणात येणारे ते ठाम शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचं महत्व समजावून सांगताना वापरलेले शब्दांचे पीच... म्हणजे मनामनात ठासून राहणारी बातमी होते, नि माणूस चाहता होत जातो रविशच्या सादरीकरणाचा आणि व्यक्तिमत्वाचा...
मग सर्च करून फडशा पडतो रविशच्या असल्या नसल्या सगळ्याच लिखाणाचा... तेव्हाच रवीश माझ्यासारख्या कित्येकांसाठी लिहू लागतो 'नई सडक' ब्लॉग... आणि उलगडू लागते पत्रकारितेचे महत्व! तेही शुद्ध हिंदीत...
भाषा नाही, भूमिका बोलते... त्यामुळे भाषा कमकुवत बनवत नाही. भाषेचा आधार घ्यावा, तिचा गर्व नसावा! याच शैलीत रवीश कुमार स्वतःला पुढे आणत जातो आणि आमच्यासारख्या कित्येक भरकटल्या पोरांना रस्ता दाखवत जातो...
पत्रकारितेच्या याच दोन वर्षात आम्ही मुले सहलीच्या योगाने नव्या दिल्लीतुन रवीश कुमारच्या भेटीला जाऊ लागतो. पण वेळ आमची चुकते आणि रवीश कुमारची भेट हुकते. पण तरीही दुरूनच त्याला स्टुडिओच्या बाहेर उभे राहून बघण्यात आनंद वाटतो.
या अनोख्या कलाकाराच्या हातातला माईक पाहून अभिमान वाटतो त्याच्या आवाजाचा... पदोपदी आवाज आणि शब्द यांचं महत्व आणि आदर समजावणार हा वेगळाच कलाकार लांबून बघण्यात सार्थक वाटतं... 
पत्रकारितेच्या क्षेत्रातील हिडीस, विक्षिप्त आणि अंगावर धावून येण्याचा स्वभाव कुठल्यातरी चंबळच्या खोऱ्यात पुरून रवीश आजही तितक्याच संयमाने आणि  जिवंतपणाने न्याय देत त्याच्या क्षेत्राला श्रद्धेने पुढे नेतो... 
ज्याच्यामुळे हिंदी वाचनाची गोडी लागली या गोडितुन लिखाणाच्या ओंजळीत हिंदी उर्दूचे चार शब्द पडले नि मीही नकळत कधी हिंदी लिहू लागले कळलही नाही....
गुलझार म्हणतात, "शायर बनने के लिए मोहब्बत की एक मुक्कमल डिग्री चाहिए"  
लेकिन मेरे लिए "ये डिग्री रवीशजी की थी, जो भावनाओंसे लपेटी डिग्री मेरे रूह को लिखने पर मजबूर करती थी |"
तरीही रवीश म्हणतो तसं कुणाचाच चाहता बनू  नका कारण, चाहत्याचा आवाज तुमचा बनेल आणि त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज विसराल. म्हणून आजच्या त्याच्या दिवसासाठी, सगळ्या देशाला अभिमान असणाऱ्या रवीशसाठी ......

'शब्दों से कीचड़ नहीं उठाते' कहता हैं,
मिडिया की खामियोंको भी लिखता हैं,
शब्द से शब्द का मतलब हैं समझाता हैं,
ये शख्स बुझी 'पत्रकारिता'को जिंदादिल जगाता हैं|

रविश एक इंसान नहीं शहर बनता हैं,
जो राजनीति और इंसान की गिरी नीति में ढले शब्द की पवित्रता समझाता हैं |
जो स्पर्धा के ज़माने में भी खुद के मूल्यों को ना छोड़ता है,

कहते हैं भाषा का आभाव हैं, ये इंसान गांव वाला हैं| 
फिर भी मैं देखती हूँ,
आवाज ये गांव की हैं, लेकिन 'नई सड़क' इसकी शहर में हैं,
कौन इंसान गांव का रास्ता इस बुझदिल शहर तक लाता हैं,
वो 'रवीश' ही होता हैं, जो खुद के उसूलों पर डटे रहकर कामयाबी पाता हैं| 

Ravish Kumar Ramon Magsaysay Award 2019.

रवीश कुमार; कलाकार माइक और उसूलों का |

by on ऑगस्ट ०२, २०१९
दोन वर्षांपूर्वी पत्रकारिता शिकायला सुरुवात केली होती. हे दोन वर्षाचं शिक्षण तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न असतो. ...
Blessed with love!

क्षण आठवून आनंद होतो पण क्षणांच्या पाकळ्यांचा दिवसच आपला असेल तर ..? 
एखादाच पण संपूर्ण दिवस आपल्याला मिळावा, एवढंच स्वप्न प्रियकर वर्गाचं असतं. 
माझा देव त्यात फार रोमँटिक... त्याने दोघांच्या नावे म्हणून की काय, अक्षरशः पावसाळी अन् बर्फाळी वातावरण भिजू घातलं होतं. माझ्या मूडला उधाण आलं होतं. फार काही नाही पण तो जवळ असायलाच हवा होता हा अट्टाहास मनाला टाळता येत नव्हता. पण नोकरीवरून सारखं सारखं कितीदा सुट्टी घ्यायची. त्यात नात्याचे आणि प्रेमाचे चोचले अती जास्त असतात.
पण गोड असतात नाही? म्हणजे त्याशिवाय का आम्ही एकमेकांत बांधले गेले असतो?. त्यातल्या त्यात हे चोचले म्हणजे आवड होती एकमेकांची.
प्रेम शाबूत आहे, जोपर्यंत प्रेम तुमच्यात आहे. तेही दोन्ही व्यक्तीकडून तितकंच खरं नि महत्त्वाचं म्हणजे निरागस हवं.!त्याला या बाहेरच्या राजकारणी, दिखाऊ प्रेमाचा स्पर्शही नसावा! जे वेंधळटही चालेल, पण किमान त्यावर लिहिलं जावं इतकं स्वच्छ असावं! 
"तुझं पण ना.."
(मागून कुणाची बारीकशी पुटपुट ऐकू आली)
"कधीही लिहायला सुचतं बाई तुला. एवढा एकटा वेळ मिळालाय आणि आम्ही हे असे नशिबी ज्यांच्या नशिबी लेखिकाबाई आल्यायत. ज्यांना दोघांच्या एकट्या वेळेतही 'किस' सोडून कविता होताय." त्याने मुद्दाम मला डिवचत म्हटलं.
"दोन चहा चालतील.
चहा मसाला टाक फक्त." मी म्हटलं.
"बरं चालतंय, पण त्यानंतर मला दोन ओळी माझ्या हव्या! "
"हावऱ्या, तुझ्यावर मी केसच करणारे ! असं दरवेळी माझ्या लेखणीकडून रिश्र्वत घेतोस... " 
"चहा हवाय ना? " त्याने खोडकरपणे विचारलं. 
"अरे मुसाफिर, तुम सिर्फ बनाकर लाओ | हम हमारे लहेजे
के साथ आपके सामने आपका पेगाम हाजिर रखेंगे...|"
"उफ ! आलोच ... "


अंहा, हे दिसतंय तितकं साधं नाही हां...

एक खोली दोघांना मिळणं... सगळं सुरळीत होणं अजिबात नाही. तेही जात-पात, स्त्री चारित्र्य, अविवाहित मुलगा मुलगी एकत्र आणि महत्त्वाचं म्हणजे शेजाऱ्यांच्या उपस्थितीत एका खोलीत लग्नाआधी पलंगापर्यंत जाणं म्हणजे भलतंच दरारक!
पण तरीही... बॉयफ्रेंडच्या मित्राचं घर तो नसताना रिकाम ठेवणं, आपल्या नव्या शास्त्रात न बसणारच. बॉयफ्रेंडने मित्राकडे प्रस्ताव ठेवण्याचा उशीर मित्र राजी न व्हायचा प्रश्न दुरदुरवर नव्हता. त्यामुळे तो जाणार हेच आमच्यासाठी प्रेमाचं स्वप्न रुजू करायची वेळ होती. अन्ह... शारीरिक नाही, रोमँटिक नि अलगद भावनिक स्वप्नकथेचं स्वप्न!
खूप बोलायचं, ऐकायचं, लिहायचं, अनुभवायचं नि हे सगळं करून कसलीच घाई न करता त्याच्या मिठीत गुडूप व्हायचं, एवढंच या आजच्या दिवसाचं सुख येणाऱ्या कित्येक निराशांना परतवणार होतं. 
आम्ही दोघे आनंदून गेलो होतो. हुरहुर मनात होतीच पण एक वेगळचं जग एका दिवसात फील करायला मिळणार होतं. म्हणजे लिव्ह-इनचं एक पाऊल आम्ही जगणार होतो. भीती नव्हती, उत्सुकता होती...
नव्या नात्याचा जिव्हाळा अजीर्ण करेल असं काहीतरी करावं, एवढाच ध्यास मनी होता. नात्यातील काही गोष्टी किरकोळ भासत असल्या तरी त्या किरकोळ थेंबात पावसासारखं मजबूत नि मनमोहक आयुष्य साकारण्याची धमक असते.
"मोहतर्मा, आईयेगा जमीन पर. ये गालिब इंतजार कर रहा हैं|" त्याचा चहा झाला होता..
मी या एवढ्या विचारांच्या गर्तेत त्याच्या अजीर्ण अस्तित्वाला लिहित गेले होते...
तर्र... तुझ्यासाठी...

दोन शब्द लिहिले, एक मोठ्ठा शब्द लिहिला. 
पण...
पण कर्ज तुझं जास्त आहे, वर काळजीचं व्याज वाढलंय. कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
तुझं प्रेम लिहू की तुझा स्पर्श लिहू की तुझ्या असण्याच वर्णन करू? की लिहू तू किती हवायस मला? 
कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
त्या ओळींना चंदनाची दृष्ट लावू की तुझ्या प्रेमाची साठवण टाकू? कोणत्या दोन ओळींत मावतं हे प्रेम? कपाट थोडी आहे की कप्प्यात टाकलं नि मावलं हे प्रेम !
...
त्यापेक्षा हे बघ... या डायरीवर, इतकं मुक्त सोडलंय मी त्याला. 
त्यामुळे दोन ओळी खोडून, लिहून प्रेमाच्या एका भावनेचं किती संशोधन केलंय, ते कोण्या शास्त्रज्ञाच्या बस की बात नहीं समझे खुश नसिब| 
पण... 
तरीही ज्याला शेवट नसतो असा चहा आहे तुझं प्रेम, 
ज्याची तक्रार असते असा प्रश्न आहे तुझं प्रेम! 

...

अशा दोन ओळी आहेस तू, ज्याला नेहमीच लिहून पुन्हा लिहित रहाव वाटतं! 
किंवा मग ... 
"ए किंवा मग काय? हा काय महाप्रसाद आहे?" तो मग्न ऐकत होता, पण त्याचा कुठल्याच प्रतिसाद नाही म्हणून मी चिडत म्हटलं,
एकवार चहाचा चस्का घ्यायचा उशीर त्याने माझ्या मानेवर त्याची हनुवटी ठेवत विचारलं, 
"पसारा नको, मुसाफिरला मंजिल ऐकायची आहे." तो म्हणाला
"थोडा मुश्किल हैं। ". मी उत्तरलो
"इश्क कहा आसान था? 
हम तरस रहे हैं...." त्याने प्रत्युत्तर केलं.
" सुनियेगा..." मी प्रयत्न करत म्हटलं. 
"क्यों? क्या सच में इतना खूबसूरत होता हैं दूसरा कोई?...
(याने हम...)
जो इंसान खुद के हिस्से का प्यार बिनशर्त बाट देता हैं बेझिझक |" 
....
इतकं हेट करतेस ? 
खूपच ! 
ये की अशी मग... त्याने लागलीच शब्दांसह मला मिठीत ओढलं.  हा पाऊस खट्याळ आपल्याला मिठीत पाहायला त्रस्त झाला नि तुला त्याच्यावर लिहून त्याला खुश करायचं सुचतंय, अन् तरीही त्या खट्याळला आपलं हे प्रेम मिठीत पहायचंय !
"खोटारडा शहाणाच आहेस की!" 
"चहा आणला ना, ये की मग अशी जवळी!"
गुदगुली नको ना, उघड्या अंगाला ओढ तुझ्या स्पर्शाची आहे, गुदगुल्या कसल्या करतोयस. तुम्हा आजकालच्या मुलांना प्रेमही जमत नाही. हे प्रेम कसं अलवार हवं. बागेतल्या झाडांवर फुलपाखराने भिरभिराव पण फुलाला टोचुही नाही, स्पर्श बागडावा या मोकळ्या कळीवर !
नि तोच त्याच्यातल्या प्रियकराला छेडल्यामुळे इम्रान हाश्मी जागा होत त्याने अलगद माझ्या पाठीच्या कडांना त्याच्या बोटांच्या स्पर्शाने लयीत ओघळत नेलं, पावसाचा थेंब पाडवा तसं नि शहारून मी मिठीत जावी त्याच्या इतकं अलवार नि रोमांच उभे करणार होतं.
यापुढे काही होणार नाही, असं काहीसं मनात होतं, कारण शारीरिक प्रेमाने भावनिक प्रेम दुरावलं जातं.
त्याने अलगद मला कोणत्याच नजरेने न पाहता उचलून हलकेच बाथ टबात नेलं. तोच स्पर्श नीलायम ठेवत त्याने आमच्या ठेवणीतले निकोलसचे " ए वॉक टू रिमेंबर" हे पुस्तक वाचायला सूरुवात केली. पण वाचता वाचता एका वाक्याशी अचानक तो थांबला नि म्हणाला, बघ ना...
या पुस्तकासारखा एक वॉक तर आपण घेतलाय. या पुस्तकाला वाचताना आपण एकमेकांसोबत हा वाचनाचा प्रवास तर केलाय. पण हा लेखक निकोलस स्पार्क्स पुस्तकाचा शेवट असा करतो की, "आपल्या प्रेमातला हा पायी प्रवास खडतर पण लक्षात राहणारा होता. यामुळेच मला चमत्कारांवर विश्वास बसू लागला. हा प्रेमाचा चमत्कार एवढा सुंदर असतो आणि शेवटी ती मरते."
याला काय अर्थ आहे... या वॉक मध्ये सगळचं तुटक आहे, कशालाच पूर्णत्व नाही. वॉक हा असा अर्धवट राहतो...?
तो इमोशनल होऊन त्या टबा वर डोकं टेकवून बोलतच राहिला. .
"होना, अर्धवटच राहतो."
म्हणत मी त्या टबाच्या कड्यावरून पळून जात घासरणारच तोच त्याच्या पिळदार हातांनी माझ्या कमरेच्या विळख्यात हातांचा स्पर्श गुंफवून त्याने मला सावरत जवळ घेतलं नि म्हणाला,

"पुस्तक किती प्रश्न किती उत्तरे आणि किती समजूतदार बनवतात ना माणसाला? आणि या पुस्तकांची लेखिकाच मला मिळाली...
आपला वॉक अर्धवट नाही ठेवणार मी! कधीच नाही, मी तुला उचलुन घेऊन चालेल, तू साथ देशील ना? ..."
-----